नवी दिल्ली, 27 मार्च : साप हा सर्वात धोकादायक प्राणी आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी असणारा साप हा सर्वात भीतीदायक आणि भयानक आहे. साप म्हटलं तरी अनेकांच्या मनात भीती भरते. सापाचे आत्तापर्यंत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये साप चक्क स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घराच्या छतावर एक साप बसला आहे आणि त्यानंतर त्याने असा स्टंट दाखवला, जे पाहून लोक हैराण झाले. या घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. सापाने घराच्या छतावरुन हवेत एवढी उडी मारली. असा धोकादायक स्टंट साप केल्याचे क्वचितच पाहायला मिळते. हा व्हिडिओ IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी तिच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव होतोय.
Incredible pic.twitter.com/xbHi3w21nU
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) January 31, 2023
Author: Maharashtra Manthan
Post Views: 174












Users Today : 2
Users Yesterday : 4
Users This Month : 195
Users This Year : 768
Total Users : 42536
Views Today : 2
Total views : 59564
Who's Online : 0