कात्रज ते दत्तनगर सर्व्हिस रोड
जाम झाल्याने नागरिक हवालदिल

कात्रज, दि. 5 (रफिक शेख) :- कात्रज ते दत्तनगर सर्व्हिस हा रोड मुळतः अरूंद आहे. त्यातच बेकायदेशीरपणे लावलेल्या वाहनांमुळे तो अधिक अरूंद होत आहे. पोलिसांना अनेकवेळी तक्रार करूनही नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. आज अशाचवेळी मुलांची वार्षिक परिक्षेची लगबग असताना या अरूंद रस्त्यावर वाहनांच्या वर्दळीमुळे पूर्ण रस्ता जाम झाला. त्यामुळे हे नागरिक आणि वाहनचालक पूर्णपणे हवालदिल झाले असून नागरिक रास्ता रोको करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्वरित वाहतूक विभागाने तेथे जावून परिस्थिती आटोक्यात आणावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

https://www.instagram.com/reel/Cqpm1F-KUTs/?igshid=YmMyMTA2M2Y=

Leave a Comment

READ MORE