धमकीच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी – सचिन काळभोर

भोसरी, दि. ६ (शफीक शेख) :- भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे ह्यांना परिवर्तन हेल्पलाईन नंबरवर ३० लाख रुपये रक्कम खंडणी मागणी करण्यात आली असून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यासंदर्भात एमआयडीसी भोसरी पोलिस स्थानकात अज्ञातविरोधात गुन्हा क्रमांक ३१७/२०२३ क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याअनुषंगाने आमदार लांडगे यांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना Z+ सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे केली आहे.

यापूर्वीही आमदार महेश लांडगे ह्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता त्या वेळी भोसरी पोलिसांनी काही गुंडांना ताब्यात घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आमदार पोलिस सुरक्षा तैनात असताना सुद्धा अपघात झाले आहे. विनायक मेटे, जयकुमार गोरे, योगेश कदम यांच्या वाहनाचा अपघात झाला असून आमदार महेश लांडगे ह्यांना ३० लाख रुपये खंडणी रक्कम मागणी करण्यात आली आहे .

या पार्श्वभूमीवर पुन्हा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने असून आमदार महेश लांडगे ह्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे.

Leave a Comment

READ MORE