पिंपरी, दि. 7 (शफिक शेख) :- केंद्र व राज्य शासनाचे सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असुन या प्रकल्पातील ६ सोसायट्यांच्या इमारतीमधील एकुण २५२ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत ०६ एप्रिल २०२३ रोजी प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते काढण्यात आली.
घरकुलच्या माध्यमातुन नागरीकांचे घराचे स्वप्न साकार होत असुन त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा. आपल्या परिसरात स्वच्छता ठेवावी व मिळालेली सदनिका विक्री अथवा भाड्याने देवु नये असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले. या कार्यक्रमास सहा. आयुक्त सुषमा शिंदे, प्रमोद निकम, दशरथ कांबळे, शरद मोरमारे, विष्णु भाट, सुनिता चौगुले पाटील, योगिता जाधव यांच्यासह झोनिपु विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच लाभार्थीसह सर्व उपस्थित होते. कार्यालय अधिक्षक विष्णु भाट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. १४८ इमारत क्र. एफ-१३, सोसायटी क्र. १४९ इमारत क्र. एफ – १७, सोसायटी क्र. १५० इमारत क्र. डी- ८, सोसायटी क्र. १५१ इमारत क्र. डी-१२, सोसायटी क्र. १५२ इमारत क्र. एफ-१४, सोसायटी क्र. १५३ इमारत क्र. एफ-१८ या सर्व सोसायटी अध्यक्ष यांचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.












Users Today : 8
Users Yesterday : 4
Users This Month : 201
Users This Year : 774
Total Users : 42542
Views Today : 19
Total views : 59581
Who's Online : 0