माईंडस्पेस हॉटेलच्या 120 कामगारांना न्याय मिळाला

पिंपरी, दि. 9 (शफिक शेख) :- ‘‘माईंडस्पेस कंपनीने मोबदला न दिल्याने 120 कामगार आत्महत्येच्या मार्गावर’’ या मथळयाखाली दिनांक 4 एप्रिल रोजी आम्ही लॉकडाउन आणि कोव्हिडमुळे बंद पडलेल्या माईडस्पेस हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड आणि आता पूर्वस्थितीत आल्यानंतरही सुमारे 120 कामगारांचे थकित वेतन आणि इतर मोबदला न दिल्याने आत्महत्या करण्याच्या मार्गावर आलेल्या कामगारांच्या यातनांविषयी एक बातमी प्रसिद्ध केली होती. याच बातमीचे पडसाद हे समाजमाध्यमांमध्ये अत्यंत ज्वलंत रितीने पडू लागल्याने सदर माईंडस्पेस हॉटेल अॅंड रिसॉर्टचे मालक श्री. प्रशांत भंडारी आणि श्री. अमोल थोरात आणि कामगार श्री. अनिल श्रीमंदिलकर हे बोलणी करण्यासाठी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस स्टेशन येथे जमले आणि सदर मालकांनी कामगारांना त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे कबुल केले. मागील अनेक दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या सर्व कामगारांना महाराष्ट्र मंथनचे मुख्य संपादक यांचे या सहकार्याबद्दल आभार मानले.

Leave a Comment

READ MORE