कोलकाता, दि. 10 (महाराष्ट्र मंथन) :- कोलकातामधील एका प्रकरणावर निकाल देत कोर्टाने म्हटलं आहे की, पत्नी कुठल्याही ठोस कारणशिवाय जर पतीला त्याच्या आई-वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी वारंवार दबाव टाकत असेल तर ही एक प्रकारची क्रूरता आहे. अशा परिस्थितीत पतीला पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज करता येईल, असे मा. उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
हा निर्णय देताना उच्च न्यायालयाने याबाबत 2016 मधील सुप्रिम कोर्टाच्या एका निकालाचा दाखल दिला. ज्यात एका पत्नीने पतीवर दबाव टाकून आई वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी छळ केला. त्यावर पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यावर घटस्फोटासाठी हे कारण पुरेसे असल्याचे मा. सुप्रिम कोर्टाने सांगितले.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 72












Users Today : 8
Users Yesterday : 4
Users This Month : 201
Users This Year : 774
Total Users : 42542
Views Today : 15
Total views : 59577
Who's Online : 1