(महाराष्ट्र मंथन)
राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या तीनही पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हे मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द केली आहे. या कारवाईनंतर आता या तीनही पक्षांना संपूर्ण देशात एकच चिन्हावर निवडणूक लढविता येणार नाही.
खरं तर, 2016 मध्ये, निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी नियम बदलले आहेत. आता हा आढावा पाच ऐवजी 10 वर्षात घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का असून राष्ट्रवादीचे नागालँड मध्ये आमदार देखील आहेत. तसेच लोकसभेत खासदार ही असून देखील या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राष्ट्रीय पक्ष असण्यासाठी नियमांनुसार पक्षांना एकूण मतांपैकी सहा टक्के मतांची आवश्यकता असते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा टक्के मते मिळालेले नाहीत, असा युक्तिवाद करण्यात येत आहे. मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार कमी झाल्यामुळे ही कार्यवाही आयोगाकडून झाल्याचे सांगण्यात येत आहे












Users Today : 0
Users Yesterday : 7
Users This Month : 72
Users This Year : 472
Total Users : 42240
Views Today :
Total views : 58520
Who's Online : 0