पुणे, दि. १५ (महाराष्ट्र मंथन) :- यातच पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी असणारा गुडलक कॅफे म्हणजे पुणेकरांच काळीजचं आहे. फर्ग्युसन ( FC रोड ) वरती असणारा हा कॅफे गेली कित्येक दशक तिथच स्थित आहे. जवळील कॉलेजचे विद्यार्थी, काम करणारे एम्प्लॉईचं, प्रेमी युगुलं आणि येणाऱ्या जाणार्याच रमन्याच ठिकाण म्हणजे हा कॅफे आहे. पुण्यातल्या गोष्टी जगात भारी आहेत, अस पुणेकरांकडून म्हंटल जात. मग पुण्याच्या ऐतिहासिक गोष्टी, खाण्या पिण्याचे पदार्थ,एवढंच काय, इथल्या वास्तू, रोड आणि पुण्याची भाषा यांचं देखील इथं तोरा मिरवला जातो. या सर्व पुण्याच्या अस्मितेच्या गोष्टी यांचं पुणेकरांना भलतंच अप्रूप असत.
या कॅफेचा गेली कित्येक वर्षे लाल पांढऱ्या रंगाचा बोर्ड, भिंतीचा रंग पुणेकरांच्या रोजच्या सवयीचा झाला होता. बऱ्याच लेखकांच्या पुस्तकात याचा उल्लेख ही येतो. पण हल्ली या कॅफेचा रंग ढंग बदलल्याने नेहमीचे पुणेकर जरा चलबिचल झाले आहेत. तर गुडलक कॅफेच इंग्रजी नाव मराठी केलेलं आपल्याला पाहायला मिळतय.
आता यावरती नेटकरी देखील चांगलीच मजा घेत आहेत. तर चाहते म्हणतात, “कुठं नेऊन ठेवला गुडलक माझा?”
एक जण म्हणतो, “मी गुडलक चौकात गेलो पण बदललेल्या रंगाने मला वाटेचना मी तिथे”आलोय!
असा प्रेमळ वारसा असणारा गुडलक कॅफे आता सोशल मीडियावर भन्नाट प्रकारे ट्रोल होत आहे. इंग्रजी नाव मराठी केल्यामुळे नागरिकांकडून स्तुती ही केली जात आहे.
