किवळे, दि. १७ (महाराष्ट्र मंथन) :- किवळे येथील अनधिकृत होर्डिंग्ज पडून झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत पडलेल्या आणि जखमी नागरिकांना त्वरित आर्थिक मदत मिळावी आणि शहरातील अशा सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन युवक आघाडीचे शहराध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी केली.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सुनील जावळे यांच्यासमवेत काही कार्यकर्त्यांना अपघात झालेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पाठवले असता त्यांना खरंच त्या जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक आणि मानसिक मदतीची गरज असल्याचे जावळे यांनी पाहिले. त्या पाहानीवरून जावळे यांनीही त्या जखमींना आणि मृतांच्या नातेवाइकांना त्वरित आर्थिक मदत मिळावी आणि शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यांनी केली.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 14
Total views : 59576
Who's Online : 0