वाकड, दि. ३० (महाराष्ट्र मंथन):- पिंपरी चिंचवड परिसरात बसमध्ये चोरी करणाऱ्या चार महिलांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या महिलांकडून 5 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सोनिया अजय कांबळे (वय ३१), मीना मिलिंद उपाध्य (वय ३०), सुमन प्रताप काळे (वय २९), लक्ष्मी बिलिमवर उपाध्ये (वय २१, सर्व रा. राजीव गांधी नगर, झोपडपट्टी, विश्रांतवाडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड परिसरात बसमध्ये होणाऱ्या चोरींचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकरणाला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत वाकड पोलिसांच्या वतीने पथक तयार करण्यात आले असून, तपासा दरम्यान काही संशयित महिला डांगे चौकातील बीआरटी बस स्टॉप जवळ फिरत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली असता, या पथकाद्वारे आरोपींना अटक करण्यात आली. या महिला आरोपींकडून ४ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये किमतीचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल आहे. तसेच तपासा दरम्यान पिंपरी चिंचवड परिसरातील बस मधील चोरीचे पाच गुन्हयाची त्यांनी कबुली दिली. आरोपींविरोधात भा.द.वि. कलम ३७९, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.
सादरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, डॉ. काकासाहेब डोळे, श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, संतोष पाटील, रामचंद्र घाडगे, सचिन चव्हाण, बिभीषण कण्हेकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, वंदू गिरे, संतोष बर्गे, संदीप गवारी, दीपक साबळे, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, तात्या शिंदे, कोतेय खराडे, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घाडगे, रमेश खेडकर यांनी केली.












Users Today : 0
Users Yesterday : 7
Users This Month : 72
Users This Year : 472
Total Users : 42240
Views Today :
Total views : 58520
Who's Online : 0