मुंबई, दि. १ (महाराष्ट्र मंथन) :- महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा सोमवारी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर होणार आहे. सायंकाळी साडेपाच पासून सभेला सुरुवात होईल. बारसू रिफायनरीसह विविध मुद्द्यांवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्रातील भाजपला घेरण्याची विरोधकांची रणनीती आहे. तसेच या सभेच्या माध्यमातून मविआची विशेषतः शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील सभानंतर आज बीकेसीत मविआची तिसरी वज्रमूठ सभा होईल. ही सभा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.
यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक या सभेला उपस्थित राहतील. अजित पवार, नाना पटोले या सभेला उपस्थित राहतील. सभा मुंबईत असल्याने भाषणाचे मुख्य आकर्षण उद्धव ठाकरेच राहतील, असेही राऊत म्हणाले.












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0