पिंपरी, दि. २ (शफीक शेख) :- आजच्या काळात जेव्हा माणुसकीची सर्वत्र वानवा जाणवत आहे. अशा काळामध्ये एका गरीब रिक्षावाल्याकडून माणुसकीची जोपासना केल्याचे आज दिसून आले. रिक्षामध्ये विसरलेल्या बॅगेमधील सुमारे दोन लाखांचा ऐवज त्या गरीब महिला प्रवाशास परत देण्याचे कौतुकास्पद कार्य पिंपरी येथील रिक्षाचालक सचिन जनार्दन गायकवाड यांनी करून आजही माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जफरीन सादिक शेख या महिला प्रवाशाने स्वारगेट येथून मुकाई चौक रावेत येथे जाण्यासाठी रिक्षा क्रमांक MH-12-QE-2453 भाड्याने घेतली. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर महिला प्रवाशाकडून नजरचुकीने दोन बॅग रिक्षातच विसरले. त्या बॅगेत सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने त्या गरीब प्रवासी महिलेचे होते. आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेचे सदस्य रिक्षा चालक गायकवाड यांनी माणुसकीचे दर्शन घडवीत सुमारे दोन तास शोधून पिंपरी पोलीस स्टेशन येथे ती बॅग जमा केली आणि पोलिसांमार्फत त्या महिला प्रवाशाचा शोध घेऊन ते दागिने आणि बॅग महिला प्रवासी जफरीन यांना सुपूर्द करेपर्यंत ते रिक्षाचालक पिंपरी पोलीस स्टेशन मध्येच हजर होते.
या प्रकरणात प्राध्यापक बी. बी. शिंदे, महाराष्ट्र मंथन चे मुख्य संपादक शफिक शेख, नॅशनल न्यूजपेपर मूकनायकचे वरिष्ठ पत्रकार व अनुवाद आपला पोर्टलचे संपादक लक्ष्मण रोकडे, हरिश्चंद्र शिंदे यांनी सदर दागिने त्या महिला प्रवाशास मिळण्यामध्ये विशेष परिश्रम घेतले.
या संपूर्ण प्रकरणात पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिसाळ साहेब, एलआयबीचे पांडुरंग जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे, हवालदार खाडे, हवालदार बेंदरकर, हवालदार जाधव या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले.












Users Today : 8
Users Yesterday : 4
Users This Month : 201
Users This Year : 774
Total Users : 42542
Views Today : 16
Total views : 59578
Who's Online : 0