
पिंपरी, दि. 6 (महाराष्ट्र मंथन) :- भीमशक्ती सामजिक संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तथागत गौतम बुध्द जयंती निमित्त पिंपरी येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक पुण्याचा राघु फेम राहुल शिंदे आणि सुप्रसिद्ध गायिका राखीताई रोहम यांचा आंबेडकरी जलसाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील मैदान, पिंपरी चौक, या ठिकाणी मोठया जल्लोषात संपन्न झाला. सदरील कार्यक्रमाचे आयु. पंकजभाऊ वाघमारे व आयु. सुरजभाऊ गायकवाड यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज भास्कर सर यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मॅक्स भैनवाल, अमित चंदा व भिमटोला मित्र मंडळाचे अध्यक्ष निखिल जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिं.चिं.अध्यक्ष इम्रान शेख, शिवसेना युवा सेनाचे नेते अभिजित गोफण हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र मंथन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री. शफिक शेख यांचा सन्मानही इम्रान शेख यांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक “पुण्याचा राघु फेम” राहुल शिंदे, पंकजभाऊ वाघमारे व सुरजभाऊ गायकवाड यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तसेच पैलवान छबुलाल आहेर यांना त्यांच्या पैलवानकिच्या कारकिर्दीबद्दल मरणोत्तर “भीमशक्ती गौरव” पुरस्कार त्यांचे चिरंजीव चतुर आहेर यांना महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक राहुलभाऊ शिंदे, कार्यक्रमाचे आयोजक पंकजभाऊ वाघमारे व सुरजभाऊ गायकवाड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शहरातील पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे नॅशनल न्यूजपेपर मूकनायकचे वरिष्ठ पत्रकार लक्ष्मण रोकडे, विजय जगताप, सुरज साळवे, विकास कडलक, दिलीप देहाडे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
सदरील कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहरामधील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते धीरज वानखेडे, राजनजी नायर, प्रा. प्रमोद डोंगरदिवे, विजय मसुरे, विद्याताई जाधव, प्रतिभाताई बनसोडे, परमेश्वर निसरगंध, सिद्धू कांबळे, गौतम गायकवाड, समर्थ जाधव, रामभाऊ ठोके, माऊली बोराटे, लालासाहेब गायकवाड, शिवाजी झोडगे, अरूण मोराळे, राजू सरवदे, ऋषीमुनी लोखंडे, लक्ष्मण पांचाळ तसेच उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 9
Total views : 59571
Who's Online : 0