केरळ, दि. ७ (महाराष्ट्र मंथन) :- “द केरळ स्टोरी” चित्रपटाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे एका विशेष धर्माची वाईटपणाची बखाण करण्यात एक विशेष दूषित विचारसरणी असणारे लोक व्यस्त असताना. केरळमधील रहिवासी असणारे अली सोहराब यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर केरळ मधील खरी स्थिती दाखविली आहे.
यामध्ये केरळमधील कासरगोड येथील अब्दुल्ला आणि त्याची पत्नी खदिजा यांनी आई-वडील गमावलेल्या १० वर्षांच्या हिंदू मुलीला दत्तक घेतले. स्वतःच्या पोटाच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला. तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी कोणतेही दबाव ना टाकता तिला हिंदूच राहू दिले. तिला तिचा हिंदू धर्म जोपासण्यासाठी ज्या काही वस्तूंची गरज होती ती पूर्ण केली. आणि आता ती आता २२ वर्षांची झाल्यानंतर अब्दुल्ला आणि त्याची पत्नी खदिजा यांनी तिचे लग्न एका हिंदू मुलाशी पूर्ण हिंदू विधींनी लावून दिले.
यावरून आमच्या सर्व वाचकांना विनंती आहे की नाण्याची केवळ एकच बाजू न पाहता खरी स्थिती पाहण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या सर्व धर्म समभाव विचारसरणीला तडा जावू देवू नये…
द रियल केरल स्टोरी: केरल के कासरगोड के अब्दुल्ला व उनकी पत्नी खदीजा ने 10 साल की एक हिंदू लड़की को गोद लिया था जिस लड़की ने अपने माता-पिता को खो दिया था, वह अभी 22 साल की है।
— Ali Sohrab (@007AliSohrab) May 6, 2023
अब्दुल्ला व उनकी पत्नी खदीजा ने पूरे हिंदू रीति-रिवाजों के साथ उसकी शादी एक हिंदू लड़के से कर दी। pic.twitter.com/loNOyhc2jc












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0