पिंपरी, दि. ८ (महाराष्ट्र मंथन):- पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत वाढत्या जबरी चोरी, घरफोडीच्या अनुशंगाने मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सो. यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करताना इसम नामे १) सोमा दुर्गप्पा चौधरी, वय १९ वर्षे, रा. ७८६ / मुन्नाभाई चाळ, पवार पेट्रोलपंप जवळ, नेहरुनगर, पिंपरी, पुणे, २) मुदस्सर अहमद सय्यद, वय-२१ वर्षे, रा. ४२०/४०१८, वल्लभनगर, बॅडमिंटन हॉल जवळ, पिंपरी, पुणे व एक विधी संघर्षीत बालक यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी भोसरी एम. आय. डी. सी अंतर्गत ०७ व सांगवी पोलीस ठाणे अंतर्गत जबरी चोरीच्या गुन्हयांतील २३ मोबाईल जप्त करुन एकुण ०८ जबरी चोरी व ०१ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने चिखली, भोसरी व भोसरी एम.आय.डी पोलीस ठाणे अंतर्गत गहाळ नोंद असलेले मोबाईल पैकी ४६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. अद्यापपर्यंत १८ मोबाईल, मुळ मालकांना परत करण्यात आले. उर्वरीत मोबाईल त्यांचे मालकांना परत देण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर कारवाई दरम्यान विविध कंपनीचे एकुण ६९ मोबाईल असा रु. ७, १०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, वपोबनि संजय तुंगार ( सायबर गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख पो. अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर व तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 14
Total views : 59576
Who's Online : 0