
चिंचवड, दि. १० (महाराष्ट्र मंथन) :- चिंचवड येथील एका कारखान्यात भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी मे. महाराष्ट्र मिल्क डेअरी, सर्वे नं. २९५, चित्तराव गणपी मंदीरा जवळ चिंचवड पुणे याठिकाणी छापा घालुन, मे. महाराष्ट्र मिल्क डेअरीचे मालक नामे १) साजीद मुस्तफा शेख वय ३२ वर्षे रा.शिवर्तीथनगर, संभाजी बारणे यांचे ऑफीसजवळ, पडवळनगर थेरगाव पुणे २) जावेद मुस्तफा शेख वय ३८ वर्षे रा. सदर कामगार ३) राकेश श्रीबुध्दराम सिंग वय २६ वर्षे रा. महाराष्ट्र मिल्क डेअरी, सर्वे नं.२९५, चित्तराव गणपी मंदीरा जवळ चिंचवड पुणे ४) अल्ताफ हजरतद्दीन शेख वय २७ वर्षे रा.सदर ५) अभिषेककुमार योगेशबाबु यादव वय २२ वर्षे रा.सदर ६) सर्फराज शराफतउल्ला शेख वय ३५ वर्षे रा. सदर यांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडुन भेसळयुक्त पनीर तयार करण्याकरीता वापरत असलेले १४,०००/- रुपये किंमतीचे १४० लिटर अॅसेटीक अॅसीड, ६,३२०/- रुपये किंमतीचे ६० लिटर आरबीडी पामोलीन तेल, ४,५००/- रुपये किंमतीचे २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट, ३,३२,५००/- रुपये किंमतीची ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १०९,२००/- रुपये किंमतीचे ५४६ किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकुण ४,६६,५२० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जप्त करुन, पुढील कारवाईकामी ताब्यात घेतला आहे.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.डॉ.संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा.स्वप्ना
गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार,
सहा.पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा पोलीस उप निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, चंद्रकांत जाधव, किरण काटकर यांनी केली आहे.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 14
Total views : 59576
Who's Online : 0