
भोसरी, दि. 12 (महाराष्ट्र मंथन) :- भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि शिव श्रमिक मजदुर संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते मनोज भाऊ कसबे यांच्यावतीने चिखली कुदळवाडी परप्रांतिय कामगार यांची होणारी अमानवी प्रवासी वाहतूक याच्या विरोधात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अतुल आदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीवर तत्परतेने कार्यवाही करीत चोवीस तासांच्या आत गुरूवारी रात्री 11 वाजणेच्या सुमारास चिंबळी फाटा मोशी येथे बस क्रमांक UP55 AT 1893 ह्या खाजगी प्रवासी बसवर मोटार वाहन निरीक्षक अनुश्री केंद्रे व त्यांच्या सहका-यांनी कार्यवाही करीत 1 लाख दोनशे रुपये दंड ठोठावला.
पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त करीत भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी आणि शिव श्रमिक मजदुर संघटनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष सतिश भांडेकर, सचिव गोपाल कच्छवे, कार्याध्यक्ष अमित मोहिते यांच्यावतीने परिवहन अधिकारी यांना पुष्पगुच्छ देवून आभार मानले. तसेच परिवहन विभाग अधिकारी यांनी यापुढेही अशीच कार्यवाही सुरू राहील असे आश्वासन दिले.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 9
Total views : 59571
Who's Online : 0