उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार – सचिन काळभोर

निगडी, दि. १४ (महाराष्ट्र मंथन) :- पिंपरी चिंचवड शहरातील उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उद्या पिंपरी चिंचवड शहरात येत असून साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून गेल्या ४६ वर्षांपासून पिंपरी चिंचवड येथील शेतकरी बांधव संघर्ष करत असून शिंदे भाजप सरकारने पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना गाजर दाखवून झूलवत ठेवले आहे. गेल्या अधिवेशनात १५ दिवसांत पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येणार म्हणून घोषणा करण्यात आली होती. चार महिने झाले तरी सुद्धा साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून बैठक घेतली होती. सध्या देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून आशावादी नाही किंवा त्यांना विसर पडला असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करून साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा प्रश्न सोडविण्यात यावा म्हणून मागणी करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांना प्रत्येक उद्घाटन कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाणार आहे, अशी माहिती सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर यांनी दिली.

Leave a Comment

READ MORE