पिंपरी, दि. 14 (महाराष्ट्र मंथन) – सेक्टर नंबर 22 अंकुश चौक निगडी येथे दलित समाज मोठा प्रमाणात आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती असणारी येथील दलित वर्गाची श्रद्धा आणि आत्मियता पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सेक्टर नंबर 22 अंकुश चौक निगडी पुणे 411044 येथील नवीन कमानीच्या प्रवेशद्वारावर यापूर्वी होते तेच नाव म्हणजेच “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत” हे नाव देण्यात यावे, अशी मागणी कुतूबुद्दीन आबू होबळे, सचिव ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पिंपरी चिंचवड शहर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंग यांना केली. तसेच सदर मागणीचे निवेदनही आयुक्त कार्यालयात आणि ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना देण्यात आले.
यावेळी अकील भाई मुजावर महासचिव AIMIM पक्ष महाराष्ट्र राज्य, हाफिज अबू बकर उप शहरअध्यक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM), दिपक कांबळे उप शहर अध्यक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) आणि मोठया प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 9
Total views : 59571
Who's Online : 0