नेहरूनगर, दि. 15 (महाराष्ट्र मंथन) :- लहान मुलांच्या जीवनास धोका पोहचू नये म्हणून पिंपरी चिंचवड प्रभाग क्र 9 मध्ये, नेहरूनगर मधील महानगरपालिकेचे शाळा संकुल येथील एक ईमारत मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने काळजी घेवून येथील मा. नगरसेवक व विरोधी पक्षनेते श्री. राहूल भोसले, मा. नगरसेवक श्री. समिर मासूळकर, मा. नगरसेविका सौ. वैशाली घोडेकर, मा. नगरसेविका सौ. गिता मंचरकर या चारही नगरसेवकांनी पाठपुरावा करून त्या ईमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले व ईमारत धोकादायक असल्याने त्याला पाडण्याचा ठराव केला.
मुलांच्या आयुष्याबाबत कोणताही धोका न पत्करता ती जुनी ईमारत पाडून त्याठिकाणी नवीन सर्व सोयीयुक्त अशी अत्याधुनिक ईमारत निर्माण होण्यासाठी खूप प्रयत्न केले. पालिकेकडून निधी घेतला, ईमारतीचे डिझाईन फायनल केले. ईमारत उभारताना बारिक बारिक गोष्टींकडे लक्ष दिले व आज रोजी नेहरूनगर व आजुबाजुच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही नवीन सुंदर शाळा ईमारत उभी झाली.
आज महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. अशातच प्रशासन “इसकी टोपी उसके सर, उसकी टोपी इसके सर” याप्रमाणे वागताना दिसते आहे. त्यामुळे उदघाटन कोणाच्या हस्ते होणार, श्रेय कोण घेणार यापेक्षा ह्या नवीन शाळा उभारणीचे संपूर्ण श्रेय व मेहनत आम्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चारही नगरसेवकांची आहे आणि हेच सत्य आहे, असे चारही नगरसेवकांनी बोलून दाखविले.