राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राहुलभाऊ भोसले यांना वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा- राजन नायर


पिंपरी, दि. १६ (महाराष्ट्र मंथन):- पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेतृत्व, सर्व समाज व युवकांचे प्रेरणास्थान असलेले, पिंपरी चिंचवड शहराचे कार्यक्षम नगरसेवक व राष्ट्रवादीचे सन्माननीय कार्याध्यक्ष श्री. राहुलभाऊ भोसले यांच्या १७ मे २०२३ वाढदिवसानिमित्त त्यांना प्रथमतः हार्दिक शुभेच्छा श्री. राजन नायर यांनी दिल्या.
राहुलभाऊ भोसले यांचे वडील मा. हनुमंतराव भोसले यांनी पिंपरी चिंचवड मध्ये काम करत असताना त्यांनी गोरगरिबांना सन्मान दिला, त्यांना समजून घेतले, त्यांच्या प्रती आपुलकी दाखवली त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली आणि महानगरपालिके मध्ये प्रथम उपमहापौर, महापौर, विरोधी पक्ष नेते, विधी समिती अध्यक्ष या पदावर राहून समाजासाठी काम केले. नेहरूनगरचा केलेला विकास हे सर्वांत अवर्णनीय काम आहे. या कार्यात श्री. सतिशभाऊ भोसले व श्री. राहुलभाऊ भोसले यांचा देखील सहभाग आहे.
मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला त्यानंतर माझा आणि राहुलभाऊ भोसले यांचा संपर्क येऊन पार्टीसाठी काम करत असताना संबंध वाढले व त्यांच्या सोबत काम करत असताना खूप काही शिकायला भेटले व भेटत राहील
अजित दादा पवार एक प्रभावी नेतृत्व, भावी मुख्यमंत्री की जे प्रशासन मध्ये काम करताना सर्वांना घेऊन चालतात त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याला वेळेचे बंधन नाही ज्या ठिकाणी गरज आहे तेथे स्वतः उपस्थित राहून पाहणी करतात अशा अजित दादा पवार यांच्या सोबत काम करणारे युवा नेते मा. नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांच्या कामाचे कौतुक करावे तेव्हडे कमीच आहे. तरूणांनकरीता एक प्रेरणा स्त्रोत, गोरगरिबांना किंवा कोणालाही काहीही अडचण आली तर राहुलभाऊ नेहमी मदतीसाठी तयार असतात. बेरोजगारांचे हाताला काम देणे, जनतेला समजून घेणे, महिलांना सन्मान देणे हे सर्व ते पार्टी चे कार्याध्यक्ष व नगरसेवक या नात्याने अविरत करत आहेत.

पालिकेच्या अधिकार्‍यासोबत चांगले संबंध आहेत त्यामुळे कोणतेही काम ते संयमाने व समजूतीने करून घेतात. पार्टी मध्ये मी जरी नविन असलो तरी, मला सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या कडून सन्मान मिळाला व त्यामध्ये आहेत पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री.अजित गव्हाणे साहेब व राहुलभाऊ भोसले. अजित दादा पवार यांचे विश्वस्त, आदरणीय पवार साहेब यांचे विश्वस्त व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे स्वाभिमानी नेते हे राहूलभाऊ आहेत.
पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष मा. अजित गव्हाणे साहेब, सौ.कविता आल्हाट महिला अध्यक्षा पिंपरी चिंचवड शहर, मा.इम्रान शेख युवा अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर व सर्व वरिष्ठांसोबत काम करताना मला अभिमान वाटतो. राहुलभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा माझ्या कडून, माझ्या परिवाराकडून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कडून व पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व नागरिकांकडून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो, असे नायर म्हणाले.

Leave a Comment

READ MORE