पिंपरी, दि. २१ (महाराष्ट्र मंथन) :- आयपीएल क्रिकेट मॅचवर बेंटीग जुगार हिंजवडी येथून चालविणाऱ्यांची माहिती काढुन मिळाल्याने हिंजवडी पोलीस स्टेशन हददीतील फ्लॅट नंबर १४०५, आर १ जी बिल्डींग १४ वा मजला, कोलते पाटील, प्रोजेक्ट, लक्ष्मी चौक ते मारुंजी रोड, हिंजवडी पुणे या ठिकाणी इसम नामे वैभव बाबाराम डिक्कर व इतर ३ ४ इसम मोबाइल व लॅपटॉपच्या सहाय्याने लखनौ सुपर जॉइन्ट विरुध्द कोलकत्ता नाईट राईडर्स या आयपीएल मॅचवर ऑनलाईन पध्दतीने वेगवेगळया वेबसाईटवर आयडीव्दारे ऑनलाईन क्रिकेट व इतर सट्टा खेळत व खेळवित असताना मिळून आल्याने हिंजवडी पोलिसांनी सापळा रचुन आरोपींना पकडले.
आरोपींच्या ताब्यातुन १) ९०,०००/-रु किं चे दोन लॅपटॉप ३,९०,००० /- रु किं चे १३ मोबाइल फोन ३) १२००/- रु. कि. चे एक स्ट्रिक फायबर वायफाय ४) ००.००/-रु किं चे ०४ नोटबुक असा एकुण ०४,८१,२००/- रु कि. चा मुद्देमाल वसूल करण्यात पोलिसांना यश आले.
१) आरोपी वैभव बाबाराम डिक्कर, वय-२८ वर्षे, रा. मुळपत्ता-रा. बजरंगबली मंदिराजवळ, रामटेकपुरा, वॉर्ड नंबर १६, अकोट ता. अकोट जि. अकोला २) सचिन गंगाराम आजगे,वय-२३ वर्षे, मुळ पत्ता- वसमाल, ता. साकरी, जि.धुळे ३) विकास कैलास लेंढे वय – २२ वर्षे, रा. राहु पिपळगांव पो.कोरेगाव ता. दौड, जि. पुणे ४) ओमकार बिरा भांड, वय – २० वर्षे, रा. राहु पिपळगांव पो. कोरेगाव ता. दौड, जि.पुणे ५) आशिष निरांजन देशमुख, वय – २८ वर्षे, मु. कोळीवेडी ता. अकेाट जि. अकोला ६) महेश परमेश्वर काळे, वय – ३३ वर्षे, रा. फ्लॅट नंबर १, जी विंग,बिर्ला गेट,अकोला पाहिजे आरोपी ७) राम भानु शाली ८) विकास रायसिंग चव्हाण ९) प्रकाश भगवानदास तेजवाणी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांचेविरुध्द हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गु र नं ६३५ २०२३ भादंवि कलम ४२०, ३४ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ (अ), ५ व भारतीय टेलीग्राफ अॅक्ट कलम २५ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गाढवे हे करत आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, मा. पोलीस सहआयुक्त डॉ. श्री. संजय शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), स्वप्ना गोरे मॅडम, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. श्री. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुनिल शिरसाठ, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार नागेश माळी यांनी केली आहे.












Users Today : 2
Users Yesterday : 7
Users This Month : 74
Users This Year : 474
Total Users : 42242
Views Today : 2
Total views : 58522
Who's Online : 0