पिंपरी, दि. 27 (महाराष्ट्र मंथन) :- यशवंतराव चव्हाण रूग्णालयाच्या कचराकुंडीत सापडलेल्या स्त्री अर्भकाविषयी सखोल चौकशी सुरू असून त्या निर्दयी दाम्पत्याचा सीसीटीव्ही फूटेजद्वारे शोध सुरू आहे. या संपूर्ण कामासाठी 6 ते 7 तास लागतील, असे रूग्णालयाचे अधिष्ठाता श्री. वाबळे यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.
याबाबत पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. पोलीस आणि आम्ही मिळून याचा सखोल तपास करीत आहोत. आज सकाळी हे नवजात अर्भक सापडलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या काही दिवसाचे असलेले हे अर्भक आहे. नवजात अर्भकाला बघण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे हे नवजात अर्भक वायसीएम रुग्णालयातील नाही, त्या स्त्री जातीच्या अर्भकाला रुग्णालयाच्या पाठीमागील गेटमधून येवून कचरा कुंडीत फेकलं आहे, असे , असेही वाबळे म्हणाले.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 95












Users Today : 2
Users Yesterday : 7
Users This Month : 74
Users This Year : 474
Total Users : 42242
Views Today : 2
Total views : 58522
Who's Online : 0