गुन्हेगाराला अटक न करता फिर्यादी खेळाडू महिलांवर अत्याचार; ही मनुवादी शासनाची सुरूवात आहे?- ॲड. प्रकाश आंबेडकर

(महाराष्ट्र मंथन) दि. १ :- दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावेळी कुस्तीपटूंना दिल्या गेलेल्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावर केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे. ही मनुवादी शासन व्यवस्थेत सुरुवात आहे का?
ते म्हणाले की, ‘खेळाडू महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ एफआरआय आणि अटक होण्याची तरतूद आहे. अशाच प्रकारे वागणूक केंद्र सरकार महिला खेळाडू सोबत करत राहणार आहे, हे योग्य आहे का? देशभरातील महिला अत्याचाराच्या प्रकरणात सरकारची अशीच वागणूक राहणार आहे का? ही मनुवादी शासन
व्यवस्थेची सुरुवात आहे का? आदी प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
काय आहे प्रकरण?
विनेश फोगट, साक्षी मलिक यांच्यासह बजरंग पुनिया यांनी 18 जानेवारी रोजी जंतरमंतरवर धरणे आंदोलन सुरू केले. WFI अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला.
• 21 जानेवारीला हा वाद वाढल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंची भेट घेऊन समिती स्थापन केली, मात्र समितीचा अहवाल आजपर्यंत सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
• 23 एप्रिल रोजी कुस्तीपटू पुन्हा जंतरमंतरवर धरणे धरले.
28 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कुस्तीपटूंच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांच्या विरोधात विनयभंग आणि पॉस्को कायद्यांतर्गत 2 एफआयआर नोंदवले.
3 मे रोजी रात्री जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. कुस्तीपटू राकेश यादव आणि विनेश फोगट यांचा भाऊ दुष्यंत आणि 5 पोलीस या चकमकीत जखमी झाले.
• 7 मे रोजी जंतरमंतरवर हरियाणा, यूपी, राजस्थान आणि पंजाबच्या खापांची महापंचायत झाली. यामध्ये बृजभूषण यांच्या अटकेसाठी केंद्र सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता.
21 मे रोजी पुन्हा महापंचायत झाली आणि इंडिया गेटवर कँडल मार्च आणि 28 मे रोजी नवीन संसद भवनावर महिला महापंचायत काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
26 मे रोजी कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेऊन 28 मे रोजी निषेध स्थळापासून नवीन संसद भवनापर्यंत पायी कूच करणार असल्याचे सांगितले.
28 मे रोजी नवीन संसद भवनासमोर कुस्तीपटूंनी महापंचायतीसाठी जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
29 मे रोजी कुस्तीपटूंनी दिवसभर घरीच थांबून इंडिया गेटवर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला.
30 मे रोजी कुस्तीपटू आपल्या पदके टाकण्यासाठी हरिद्वारमधील हर की पौढी येथे गेले. जेथे शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी समजूत घातल्यावर त्यांनी सरकारला अल्टिमेटम देऊन निर्णय पुढे ढकलला.

Leave a Comment

READ MORE