पिंपरी, दि. 5 (महाराष्ट्र मंथन) :- बाबासाहेबांची जयंती साजरी केली म्हणून खून झालेल्या अक्षयला पिंपरी चिंचवड शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणी दुःखद आदरांजली वाहण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नांदेडमध्ये घडलेल्या अक्षय भालेराव खून प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे व हा खटला जलद गतीने चालला पाहिजे, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहूजन आघाडीच्या वतीने निषेध सभा व आदरांजली कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, शहर महासचिव संजीवनी कांबळे, राजू साळवे, ईश्वर कांबळे, ॲड. मिलिंद कांबळे, दीपक भालेराव, धनंजय कांबळे, सनी गायकवाड, रवींद्र सावळे, बाबासाहेब शिवशरण, राहुल बनसोडे विष्णू सरपते, प्रवीण कांबळे, गोरख खळगे, प्रशांत नाटेकर, सुधीर लोंढे, आर एस जानराव, रंजीत डोंगरे, शिरीष भालेराव, गणेश सोनवणे असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आदरांजली कार्यक्रमासाठी उपस्थित होते.












Users Today : 0
Users Yesterday : 7
Users This Month : 72
Users This Year : 472
Total Users : 42240
Views Today :
Total views : 58520
Who's Online : 0