पुणे, दि. 11 (महाराष्ट्र मंथन) :- श्री कृष्णा जाधव (उपजिल्हाधिकारी) द्वारा लिखित “एक तरी ओवी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार दि. १३/०६/२०२३ रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह, सातारा रोड, बीबवेवाडी पुणे येथे सायंकाळी ४ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. नवं चैतन्य प्रकाशन, अंधेरी मुंबई (सौ. सुप्रिया शरद मराठे) यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या प्रकाशन सोहळ्याचे संयोजन दैनिक राज्य लोकतंत्रने केले आहे.
श्री ज्ञानेश्वरी मधील १ ते ०६ अध्यायातील श्री ज्ञानेश्वरांनी ओव्यांद्वारे मांडलेल्या सिद्धांतांचे सहज सोप्या भाषेत निरुपण या पुस्तकात केले आहे. ७५० वर्षापूर्वी “माउलींनी’ भागवत धर्माचा पाया रचला. वारकरी सांप्रदाय ज्ञानेश्वरी मधील तत्वांची उपासना करत सर्वसामान्यांच्या जिवनात निर्भळ भक्ती रसाच्या आनंदाचे क्षण निर्माण करत आला आहे. ही तत्वं आजच्या तरुणांच्या जीवनात अती उपयुक्त ठरणार आहेत.
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक श्री मधुमंगेश कर्णिक अध्यक्ष म्हणून लाभले असून मा. डॉ. सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. आदरणीय शांतीब्रम्ह मारुती महाराज कुन्हेकर, मा. योगेश देसाई, मा. उर्जित सिंह शितोळे, मा. पुरुषोत्तम महाराज, ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर (दादा) इत्यादी जेष्ठ मंडळी, अधिकारी मंडळी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला दैनिक राज्य लोकतंत्र कडून निवासी संपादक गणेश मोकशे, कार्यकारी संपादक डॉ बाळासाहेब पिंगळे, प्रतिनिधी अनुष्का कोंड्रा व प्रतिनिधी विनायक भिसे यांची उपस्थिती आहे.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 14
Total views : 59576
Who's Online : 0