ग्लॅम मॅजिक्स तर्फे “रुह फौंडेशन”साठी दीड लाखाचा निधी

पुणे, येरवडा, दि. 11 (महाराष्ट्र मंथन) :- येरवडा येथील क्रिएटीव सिटी मॉलमध्ये शनिवारी समाजातील शोषित आणि पीडित लोकांना आधार देण्याचे काम करणाऱ्या रुह फाउंडेशन साठी निधी संकलन करण्याच्या हेतूने लोकप्रिय फॅशन उद्योजक आणि ग्लॅम मॅजिकचे संस्थापक झिवान हारून यांनी भव्य शोचे आयोजन, क्रिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आदित मित्तल यांच्या सहयोगातुन केले.
ग्लॅम मॅजिक्स तर्फे आयोजित केलेल्या ‘द शेडो हंटर्स’ या भव्य दिव्य फॅशन शो मध्ये विकलांग, तृतीय पंथीय, महिला आणि पुरुष सर्वांना एकाच रॅम्प वर दाखवून सामाजिक भेदभाव नष्ट करण्याचा संदेश देण्यात आला. या शो मध्ये विविध राज्यातून 150 मॉडेल्स सहभागी झाले होते, शोचे कोरिओग्राफी : धीरज बनकर, रवी चव्हाण, गौरव जाजू ,गौरी कदम भांडगे यांनी केले.
खडतर परिस्थितीवर मात करून समाजासाठी आदर्श ठरलेल्या व्यक्तींना या वेळी “10 रुह इम्पॅक्ट। अवॉर्ड ” व “9 ग्लॅम अचिव्हर्स अवॉर्ड” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्लॅम मॅजिक तर्फे या वेळी डिड लाख रुपयाचे डोनेशन रुह फाउंडेशन चे संस्थापक मोहम्मद शोएब यांना चेकच्या स्वरूपात देण्यात आले.
या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी शोबे, एनआरके ग्रुप, द जूनून, स्पाईस अप इव्हेंट्स, गाला, जया’ज ब्युटी,ISAS ब्युटी अकादमी, अक्षरम कलेक्शन,ग्लॅम मॅजिकस टीम, आदम सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अमित त्यागी, कार्यकारी संपादक इंडिया टुडे ग्रुप, मोहित कपूर, बॉलिवूड फॅशन स्टायलिस्ट, डॉली गद्रे, कामरतज पठाण, नीता राजदान कौल, शुभम नांगरे, माही मनोचा, रोहित मनोचा, विशाल गोलप, टिंकेश कौशिक , केतकी जानी, अंजली गाडोया,शाहरोज शाह, ममता राजपूत, दिप्ती शाह, स्नेहा प्रल्हादका हे होते.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 14
Total views : 59576
Who's Online : 0