निगडी, दि. 18 (महाराष्ट्र मंथन) :- राजनगर चिकन चौक येथील रस्त्यावर कडेला लावलेल्या तीन रिक्षा आणि एक टाटा सुमो या गाडयांना अज्ञात व्यक्तीने आग लावली असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच जबाब त्यांनी पोलिसांनाही दिला आहे. परंतु गाडयांना आग लावण्याचे कारण अद्यापही समजलेले नाही. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उंडे साहेब यांना कॉल करून माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की पोलीस उपनिरीक्षक गिरी गोसावी हे तपास करीत आहेत. त्यांनी पंचनामा देखील केला आहे. सोबतच त्यांनी सांगितले की गाड्यांचे मालक कोणीही येऊन माहिती देत नसल्याने आम्हाला त्याविषयी कारवाई करता येत नाही. तरी ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गिरीगोसावी यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून कायदेशीर कारवाई करण्यास सलग होईल.
पोलीस उपनिरीक्षक गिरी गोसावी यांना कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितले की गाड्या या जुन्या आहेत आणि अनेक महिन्यांपासून पडून आहेत प्रत्यक्षदर्शींनी त्या व्यक्तीचे जे चित्रण दिलं आहे त्यानुसार शोध सुरू आहे तरी जळालेल्या गाडी मालकांनी मला संपर्क करावा.
मागील अनेक महिन्यांपासून सीसीटीव्ही बसविण्याची नागरिकांची मागणी
यापूर्वीही या ठिकाणी अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या असल्याने नागरिकांनी अनेक महिन्यांपासून येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे मागणी महानगरपालिकेला केली होती. परंतु महानगरपालिकेने याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भविष्यात आणखी काही मोठा अपघात किंवा समाजकंटकांना त्यांचे हेतू साधता येईल असे करता येउ नये म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंग यांनी संबंधित विभागाला येथे त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 13
Total views : 59575
Who's Online : 0