पिंपरी, दि. 21 (महाराष्ट्र मंथन) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत असलेल्या ग. दि. माडगुळकर नाटयगृह हे अनेक सुविधांचा अभाव असल्याने येथे येणा-या नागरिकांना पैसे मोजूनही त्रासाचा सामना करावा लागत आहे, अशी तक्रार अर्बन सेल अध्यक्षा मनिषा गटकळ यांनी निवेदन पत्राद्वारे केली.
आकुर्डी मे महिन्यामध्ये नगरसेवक श्री. अमित गावडे यांनी कार्यक्रम घेतला तेव्हा ऑडीटोरीयम ए.सी. बंद होते मात्र महानगरपालिकेने दिनांक ०८ जून आणि ०९ जून २०२३ रोजी भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी तेथील ए.सी.ची सुविधा व्यवस्थित चालू होती त्यांनंतर दिनांक १७ जून २०२३ रोजी झी मराठी तर्फे उत्सव नात्यांचा कार्यक्रमाच्या दिवशीच तो अचानक बंद पडला? महानगरपालिका व इतर सामांन्य कार्यक्रमांमध्ये प्रशासनाकडून असा भेदभाव का? नाट्यगृहाचे दरवाजांना हॅन्डल नसल्याचे तसेच तेथील इलेक्ट्रीक ए. सी. सेवा उपकरण बंद पडल्याने कार्यक्रम आयोजकांनी व्यवस्थापकांना सांगितले असता त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे नाट्यगृहात ए.सी. सेवा असताना देखील ए.सी. सेवे अभावी कार्यक्रम घ्यावा लागला, सेवेच्या कमतरतेमुळे प्रेक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महानरगपालिकेच्या नियमानुसार सर्व भाडेवाढ रक्कम भरूनही जर सेवा मिळत नसतील तर, महानगरलिका जनतेची फसवणूक करत आहात, असे पत्रात म्हटले आहे.
सदर निवेदन देतांना मा. अजितभाऊ गव्हाणे, मनिषा गटकळ, पल्लवीताई पांढरे, लताताई ओव्हाळ, सुनीताताई अडसूळ, मनिषा जडर, प्रियाताई देशमुख, विजयाताई काटे, शोभा उघडे, निशा जामदार, मीरा कांबळे, शोभा औटी, रिनाज शीकलगार, सोनाली नितनवरे, मेघराज लोखंडे, सरचिटणीस राजन नायर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 13
Total views : 59575
Who's Online : 0