रिक्षा चालक मालकांसाठी तातडीने कल्याणकारी महामंडळ गठीत होणार – उदय सामंत

पिंपरी, दि. 23 (महाराष्ट्र मंथन) :- महाराष्ट्रातील वीस लाख रिक्षा चालक – मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी उद्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय प्राधान्याने घेऊन तातडीने रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ गठित करण्याची कारवाई केली जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रिक्षा चालक मालकांच्या शिष्टमंडळास दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे एका महत्त्वाच्या विषयासाठी उद्योग मंत्री उदय सामंत हे आले असता यावेळी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वावरील शिष्टमंडळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व रिक्षा चालक-मालकांच्या कल्याणकारी मंडळा संदर्भात चर्चा केली असता त्यांनी हे आश्वासन दिले असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समिती व देशव्यपी फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षंपासून महाराष्ट्रातील रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणीसाठी अनेक आंदोलने व मोर्चा देखील रिक्षा चालक मालकाने काढला होता त्याची देखील सरकारने आता कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली आहे. परंतु याची अंमलबजावणी व्हावी, रिक्षा चालक मालकांना इलेक्ट्रिक रिक्षासाठी अनुदान मिळावे मुक्त रिक्षा परवाना बंद व्हावा यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो टॅक्सी कृती समिती व नॅशनल ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट237 फेडरेशनच्या वतीने उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे, यावेळी सामंत यांनी वरील प्रमाणे आश्वासन दिले.

Leave a Comment

READ MORE