https://www.instagram.com/reel/CuHEDhzIahF/?igshid=MzRlODBiNWFlZA==
भोसरी, दि. ३० (महाराष्ट्र मंथन) :- जाधववाडी, राम मंदिर मैदान परीसरामध्ये सापळा लावुन आरोपी १) मंगेश युवराज कदम, वय २१ वर्षे, रा.से.नं.४, लांडगेवस्ती, अनिल फुगे यांचे रूममध्ये, भोसरी, पुणे २) अनिकेत उर्फ अनिल कैलास कदम, वय २३ वर्षे, रा. झपकेचाळ, ओमसाई किराणा स्टोअर्स जावळ, लांडगेवस्ती, भोसरी,
पुणे ३) समीर मंहमद रफीक इनामदार, वय २२ वर्षे, रा. शिंदे निवास, अंजलीनगर, गल्ली क्रमांक ३, कात्रज, पुणे, ४) अभिजीत धनाजी खाडे, वय २१ वर्षे, रा. गणेश मंदिराचे समोर, भगतवस्ती, भोसरी, पुणे यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
त्यांच्या ताब्यात मध्ये एक रिक्षा, रिक्षामध्ये महिंद्रा कंपनीचे गेअरचे १४४ जॉब, दोन दुचाकी मोटार सायकली, मोबाईल व एक आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, एटीएम कार्ड असा एकुण ०५ लाख ३३ हजार रूपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला. आरोपी यांना पुढील कारवाई कामी चिखली पोलीस ठाणे कडे वर्ग करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अमंलदार शिवाजी कानडे, बाळासाहेब कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकार, अजित रूपनवर, प्रमोद गर्जे, विशाल भोईर, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, स्वप्नील महाले, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.












Users Today : 1
Users Yesterday : 7
Users This Month : 73
Users This Year : 473
Total Users : 42241
Views Today : 1
Total views : 58521
Who's Online : 0