निगडी, दि. ३० (महाराष्ट्र मंथन) :- “स्वच्छ भारत”चा संदेश देणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांच्या या संदेशाला त्यांच्याच स्वच्छता विभागाकडून तडा गेला आहे. सेक्टर नंबर 22 मधील यमुना नगर शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारालाच उकिरड्याचे स्वरूप आले आहे. यामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या आणि परिसरातील राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांकडून सारथी हेल्पलाइनवर तक्रार करूनही त्यावर कारवाई करण्यात पालिकेचे संबंधित विभाग असमर्थ ठरत आहे. आता पालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंह यांच्याकडेच येथील रहिवाशांचे आणि रुग्णालयातील रुग्णांचे लक्ष लागून आहे. या रुग्णालयात गरोदर स्त्रिया लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक उपचारासाठी येत असतात. पावसामुळे ओला होऊन या कचऱ्याला अधिक उग्र वास येत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्यात अनेक पटींनी वाढ झाली आहे.
संबंधित विभागावर आणि यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त यांनी द्यावे आणि हा उकिरडा त्वरित स्वच्छ करण्याचे कारवाईचे आदेश द्यावेत अशी येथील रहिवासी नागरिकांची आणि रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची मागणी आहे.












Users Today : 2
Users Yesterday : 7
Users This Month : 74
Users This Year : 474
Total Users : 42242
Views Today : 2
Total views : 58522
Who's Online : 0