पिंपरी, दि. 7 (महाराष्ट्र मंथन):- मुस्लिम समाज मुलींना शिक्षणाबाबत मागास ठेवतो अशा प्रकारच्या अनेक बुरसटलेल्या आणि जुन्या विचारांना बारे कुटुंबियाने चपराक दिली आहे. त्यांनी आपली मुलगी नौशीन खालीद बारे हिला केवळ शिक्षणाची संधीच दिली नाही तर उच्च शिक्षणासाठीही त्यात मदत केली. खालिद बारे आणि तबस्सुम बारे या आपल्या आईवडिलांच्या या कष्टाचे चीज करून दाखविले आहे ते नौशीर बारे यांनी. श्रीमती रूपचंद बोरा औषधनिर्माणशास्त्र सुवर्णपदक, श्रीमती काशिबाई नवले औषधनिर्माणशास्त्र सुवर्णपदक आणि डॉ. पी. डी. पाटील सुवर्णपदक असे तीन सुवर्णपदक पटकावित समाजामध्ये मानाचे स्थान मिळविले.
याबाबत बोलताना नौशीन बारे यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या अडचणींविषयी आणि प्रत्येक अडचणीमध्ये कशा प्रकारे त्यांचे वडिल खालिद बारे आणि आई तबस्सुम बारे यांनी त्यांना साथ दिली तसेच लग्नानंतरही त्यांचे पती जीशान दळवी यांनीही जुन्या रूढी आणि पंरपरा यांना झुगारून देत आपल्या पत्नीला तिच्या शिक्षणामध्ये साथ दिली.
आज संपूर्ण मुस्लिम समाजाला एक आदर्श म्हणून असा पायंडा बारे कुटुंबियांनी घालून दिला आहे. त्याचा समाजातील सर्व मुलींनी आदर्श घ्यावा, अशी आशा यावेळी नौशीन बारे यांनी बोलून दाखविली.












Users Today : 1
Users Yesterday : 2
Users This Month : 1
Users This Year : 780
Total Users : 42548
Views Today : 1
Total views : 59610
Who's Online : 0