लेकसिटी(उदयपूर), दि. १७ (महाराष्ट्र मंथन):- आज सकाळी एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेनंतर विमानाचे तातडीने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
मोबाईलमध्ये स्फोट झाल्याची ही घटना एअर इंडियाच्या फ्लाइट 470 मध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक-470 उदयपूरहून नियोजित वेळेनुसार दुपारी 1 वाजता निघाले होते. विमानात सुमारे 140 प्रवासी होते. टेकऑफ केल्यानंतर सुमारे 10 मिनिटांनंतर फ्लाइटमधील एका प्रवाशाच्या मोबाईलच्या बॅटरीमध्ये अचानक स्फोट झाला. मोबाईलच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्याच्या आवाजामुळे विमानात बसलेले इतर प्रवाशी चांगलेच घाबरले.
त्यानंतर विमानाचे पुन्हा उदयपूरच्या दाबोक विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. उदयपूर विमानतळावर विमान उतरवल्यानंतर त्यातून 3 ते 4 प्रवासी बाहेर पडले. त्या प्रवाशांनी फ्लाइटमध्ये चढण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नंतर तांत्रिक तपासणीनंतर विमान पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले.












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0