
पिंपरी, दि. १९ (महाराष्ट्र मंथन) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जवळ दिनांक २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसैनिकांनी मिळून एका मोठ्या रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यात २०२३ रक्तदात्यांमार्फत रक्त जमा करून उद्धव ठाकरे यांना एक अनोखी भेट देण्याचा निर्धार केला असल्याचे शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी प्रत्येक रक्तदात्यास एक कृतज्ञतापर भेटवस्तू देखील शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देण्यात येणार आहे. तरी या रक्तदान शिबिरामध्ये २१०० रक्ताच्या पिशव्या (ब्लड ) गोळा करण्याचे आमचे नियोजन असल्याचे श्री भोसले यांनी सांगितले. त्या अनुशंगाने पूर्णतः तयारी झालेली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसैनिक एक जुटीने एका ताकदीने या शिबीराचे आयोजन करून हे यशस्वी करण्यामध्ये सक्रीयरित्या सहभागी झालेले आहेत. सदर झालेल्या रक्तदानाची नोंद आम्ही उद्धव साहेबांना भेट स्वरुपात देणार आहोत. तरी आपल्या प्रसारमाध्यमांद्वारे याची जाहिरात करण्यात यावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, पिंपरी विधानसभाप्रमुख तुषार नवले, चिंचवड विधानसभाप्रमुख अनंत कोन्हाळे, भोसरी विधानसभामुख धनंजय आल्हाट, सौ. सुलभाताई उबाळे, खंडागळे, महिला शहर संघटीका अनिताताई तुतारे, पिंपरी महिला विधानसभा संघटीका वैशालीताई कुलथे, भोसरी महिला विधानसभा संघटीका कल्पनाताई शेटे आदी उपस्थित होते.












Users Today : 2
Users Yesterday : 7
Users This Month : 74
Users This Year : 474
Total Users : 42242
Views Today : 2
Total views : 58522
Who's Online : 0