अल्पसंख्यांक विद्यार्थिनी छळ प्रकरण
रूपीनगर, दि. 26 (महाराष्ट्र मंथन):- आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश घेतलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थिनी आणि केवळ तिचाच नाही तर इतरही आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्याप्रकरणी शिक्षण विभागातर्फे रूपीनगर येथील भगवती इंग्लिश मिडियम शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सदर नोटिशीमध्ये शिक्षण विभागाने स्पष्टपणे नमूद केले आहे की, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि इतर शिक्षकांमार्फत या मुलांना सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याने कलम 12 च्या पोटकलम 1 च्या उल्लंघनामुळे यापुढे अशा प्रकारचे प्रकरण आढळल्यास आपल्या शाळेची मान्यता रद्द केली जाईल.
तळवडे रूपीनगर येथील भगवती इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पहिल्या वर्गात शिकत शिकत असलेल्या विद्यार्थीनीस शाळेच्या मुख्याध्यापिका व वर्गशिक्षक वैयक्तिक पातळीवर अल्पसंख्यांक असल्या कारणाने विनाकारण त्रास देत असल्याची घटना समोर आली आहे.
पिडीत मुस्लिम विद्यार्थिनीस वर्गाच्या बाहेर बसविण्यात येत असून मारहाण केली जात आहे. विद्यार्थिनी अवघी ६ वर्षाची असून तिला वर्गाच्या बाहेर काढले जात आहे. सदर विद्यार्थिनी आर.टी.ई. नियमानुसार विद्यार्थीनीच ऍडमिशन झाले आहे. विद्यार्थिनीच्या पालकांकडून डोनेशनच्या नावाखाली पाच हजार रुपये रक्कम शाळेने जमा करून घेतली असून फक्त पाच हजार रुपयेच भरले म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिकांकरवी विद्यार्थिनीस हीन वागणूक दिली जात आहे.
सदर विद्यार्थिनी अल्पसंख्यांक असून आर टी आय अंतर्गत तिचा प्रवेश मिळाला आहे म्हणूनच नाहक विनाकारण त्रास दिला जात असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ अधिकारी ह्यांना तक्रार दाखल केली होती. मात्र कोणतीही समाधानकारक कारवाई न झाल्याने आंदोलनात्मक भूमिका घेत असल्याचे सचिन काळभोर यांनी सांगितले आहे.
या संदर्भात भगवती इंग्लिश मिडीयम स्कूल, रुपीनगर तळवडे ह्या ठिकाणी दिनांक ३० जुलै, २०२३ रोजी शाळा प्रशासनाला जाग येण्यासाठी शाळेसमोर झोपून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सचिन काळभोर यांनी दिली आहे.