पुणे, दि. ६ (महाराष्ट्र मंथन) :- ओबीसी युवकांमध्ये वाचन संस्कृती वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी ओबीसी साहित्य संमेलन गरज असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मा विजय यांनी व्यक्त केले. ते बारा बलुतेदार महासंघ आयोजित ओबीसी विचार मंथन गोलमेज परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की ओबीसींची युवा पिढी मोबाईल व सोशल मीडियामध्ये गुंतली असून त्यांना वाचन संस्कृतीची जाणीव दोन देण्याची गरज आहे. ओबीसी साहित्य संमेलने होणे गरजेचे आहे. साहित्यिकांना सन्मानित करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले पाहिजे त्यासाठी त्यासाठी आवश्यक असणारे सहकार्य मी करण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी जात निहाय जनगणना व्हावी, ओबीसींना लागू असलेली “क्रिमीलेअर ची असंवैधानीक अट रद्द व्हावी यासाठी राज्यस्तरीय विचारमंथन करण्यात आले असल्याची माहिती कल्याणराव दळे यांनी दिली. तसेच ओबीसी समाजासाठी प्रेरणास्थान म्हणून जेजुरी गड निश्चित करण्यात आले असल्याची माहिती शंकरराव लिंगे यांनी दिली.
यावेळी बारा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, अरुण खरमाटे, आनंदा कुदळे, किसनराव जोर्वेकर, दादासाहेब मुंडे, सतिश कसबे, वंदना कुमावत, इकबाल अन्सारी, कुंडलिक गायकवाड, दामोदर बिडवे, दशरथ राऊत, संगीता बोराटे, बलभीम माथीरे, प्रार्थना मुंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
गोलमेज परिषदेचे आयोजन भगवान श्रीमंदिलकर, प्रतापराव गुरव, युवाप्रदेशाध्यक्ष भाई विशाल जाधव, विवेक राऊत, दिनकर चौधरी, यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय ढोके यांनी केले तर प्रा. सुभाष दगडे यांनी आभार मानले.












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0