पिंपरी, दि. 7 (महाराष्ट्र मंथन):- पहिल्या महिला मेट्रो चालकाचा मान मिळविणा-या अपूर्वा अलाटकर हिचा सन्मान राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पिंपरी चिंचवडतर्फे करण्यात आला. अत्यंत वेगाने विस्तारणाऱ्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोची सुरुवात 2 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आली. ह्यावेळी आपल्यातील कौशल्य दाखवण्याची संधी सातारा जिल्ह्यातील अपूर्वा प्रमोद अलाटकर ह्या युवतीला मिळाली. #मेट्रो ची मास्क ऑन की च्या साथीने लोको पायलट अपूर्वा हिने सर्व तांत्रिक बाबीच्या मदतीने वनाज येथून उद्घाटनाची फेरी पूर्ण केली.
मॅकॅनिकल इंजिनिअर झाल्यानंतर रीतसर परीक्षेच्या 3 फेऱ्या पूर्ण करत प्रशिक्षण घेतल्यानंतर तीने मेट्रो चालविण्यास सुरुवात केली. आपल्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील युवतीने आज अनेकांना पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालण्याचे नव्याने स्वप्न दाखविले म्हणून त्याचा सार्थ अभिमान बाळगत राष्ट्रवादी युवती संघटना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने यांच्या पुढाकाराने अपूर्वाचा सन्मान आणि सत्कार डेक्कन या स्टेशन वर जाऊन केला.
ह्यावेळी युवती अध्यक्षा वर्षा जगताप, शुभदा पवार, मेहेक इनामदार, मयुरी सोळसे, मेघना जगताप, स्नेहल मंचेकर, चैत्राली आढाव, वैष्णवी जगताप या युवती उपस्थित होत्या.
पहिली महिला मेट्रो चालक अपूर्वा अलाटकर हिचा राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसतर्फे सत्कार
READ MORE
बंदोबस्तावरील पोलिस नियममुक्त आहेत का?
January 7, 2025
No Comments
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निष्क्रिय आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा – माधव पाटील
January 5, 2025
No Comments
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खरंच “आरएसएस”च्या शाखेला भेट दिली होती का? वाचा पूर्ण सत्य…!
January 4, 2025
No Comments
देशद्रोहाच्या आरोपाखालील नेते चिन्मय दास यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला..!
January 3, 2025
No Comments
जिजामाता रुग्णालय लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी दोन डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई आणि लिपिक निलंबित
December 31, 2024
No Comments
एकाच दिवशी पोलिस, शिक्षक आणि लिपिक लाच घेताना जेरबंद…!
December 31, 2024
No Comments
भारतात उद्या दिसणार “ब्लॅक मून” (काळा चंद्र)
December 30, 2024
No Comments