राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मोफत जिम्नास्टीक सत्राचे आयोजन

पिंपरी, दि. २६ (महाराष्ट्र मंथन) :- भारतात २९ आँगस्ट हा राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी खेळाचा प्रचार प्रसार करण्याच्यादृष्टीने सर्व क्रिडा प्रेमी कार्यरत असतात. याच ध्येयाने व उद्दिष्टांने हेवन जिम्नास्टीक अकादमी ने जिम्नास्टीक खेळाच्या प्रचारासाठी मोफत जिम्नास्टीक खेळासंदर्भात माहिती सत्राचे आयोजन केले आहे. जिम्नास्टीक खेळ काय आहे? या खेळातले प्रकार काय? कोणत्या पद्धतीचे खेळाडू जिम्नास्टीक खेळाची निवड करू शकतात? या व अशा अनेक प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच श्री. हर्षद कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमात जिम्नास्टीक खेळातली राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आकर्षक, असे प्रात्यक्षिक सादर करणार आहे.
तरी कार्यक्रम हा मोफत असुन जास्तीत जास्त खेळाडू प्रेमी व पालकांनी या सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन अकादमी प्रशिक्षक प्रमुख सौ. अलका तापकीर यांनी आवाहन केले आहे.
कार्यक्रमचे नाव: Gymnastics Free Introduction seminar. कार्यक्रमाचे ठिकाण: घारेशास्त्री सभागृह, श्रीधर नगर, चिंचवडगाव. दिनांक व वेळ : २६ आँगस्ट २०२३, सायंकाळी ठिक ६:३०.
अधिक माहिती साठी संपर्क : +917620518404

Leave a Comment

READ MORE