श्रीगोंदा, दि. २९ (अहमदनगर प्रतीनिधि) :- पेडगाव येथील किल्ल्यावरील मस्जिदची भिंत पाडून तेथे महादेवाची पिंड बसवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी प्रतिक गोकुळ पाचपुते, प्रतिक रमेश गायकवाड, सतोष लगड, अर्जुन सुशिलकुमार शर्मा यांच्यासह इतर तीन-चार जणांविरुद्ध भादवी कलम 295, 143, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी संपूर्ण माहिती अशी की, शकुर आब्बास शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे पेडगाव येथे बहादुरगड (धर्मवीरगद) परिसरात जुने पडझड झालेली मंदिरे व मस्जीद आहे. मस्जिद ही गडाच्या प्रवेशव्दारासमोर आहे. मस्जीद असल्यामुळे आम्ही पेडगावातील मुस्लिम बांधव हे मस्जीदमध्ये कधीतरी नमाज पठण करण्यासाठी जात असतो.
काल दिनांक 27/8/2023 रोजी दुपारी 1:30 वा. चे सुमारास मी गावात असताना, मला पेडगाव मधील अब्दुल अस्लम आतार याचा फोन आला व त्याने सांगीतले की, बहादुरगड (धर्मवीरगड) गडाच्या प्रवेशव्दारासमोर असलेल्या मस्जीदची प्रतिक पाचपुते व काही इसम तोडफोड करीत आहेत. तेव्हा मी गावातील मन्सुर महेबुब पिरजादे, सोयब मुराद तांबोळी, समीर रशीद शेख, इरफान अजमोदीन पिरजादे, इरफान बशीर काझी असे दुपारी 2:00 वा. चे सुमारास बहादुरगड (धर्मवीरगड) गडाच्या प्रवेशव्दारासमोर जवळ गेलो असता, तेथे प्रतिक गोकुळ पाचपुते, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, प्रतिक रमेश गायकवाड, रा. श्रीगोंदा, ता.श्रीगोंदा, संतोष लगड (पुर्ण नाव व माहीती नाही), अर्जुन सुनिलकुमार शर्मा, रा. श्रीगोंदा, ता श्रीगोंदा व इतर अनोळखी तिन ते चार इसम होते. ते गडाच्या प्रवेशव्दारासमोरील मस्जिदची भिंत तोडून हिंदु धर्माची दगडी पिंड बसवित होते. त्यावेळी तेथे आम्ही त्यांना समजावुन सांगत असताना, तेथे गडपाल मच्छिंद्र सुभाष पंडीत, भाऊसाहेब शामराव घोडके, नंदकिशोरा अरुण क्षिरसागर हे तेथे होते. त्यांनी प्रतिक पाचपुते व त्याचेसोबत असणाऱ्या लोकांना येथे पिंड बसवु नका, असा विरोध केला. तेंव्हा प्रतिक पाचपुते याने आम्हाला पाहुन तुम्ही येथुन निघुन जा..! तुमचा काही संबंध नाही. तुम्ही येथे थांबु नका..! तुम्ही चालते व्हा, असे म्हणून आम्हाला दमदाटी केली आहे, असे फिर्यादी शकुर शेख यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असतं त्यांनी संगितले की, सादर इमारत ही मास्जिद आहे किंवा नाही याचा तपास करण्यासाठी पुरातत्व खात्याला पत्र देण्यात आलेले आहे. तरी त्यांच अहवाल येण्याची वाट पाहत आहोत. तोपर्यंत सादर ४ इसमांना अटक करण्यात आली आहे.
सदर इसमांनी मुस्लिम धर्माच्या मस्जीदची भिंत तोडून हिंदु धर्माची पिंड बसवण्याचा प्रयत्न करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सदर तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा पर्यंत मुस्लिम बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.












Users Today : 0
Users Yesterday : 2
Users This Month : 0
Users This Year : 779
Total Users : 42547
Views Today :
Total views : 59609
Who's Online : 0