पुण्यात पोलिस रक्षकाने लुटली पोलिस “ती”रक्षकाची इज्जत

पुणे, दि. ५ (महाराष्ट्र मंथन) :- पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस कॉन्स्टेबलवर पुरुष पोलीस कॉन्स्टेबलने तिला शीतपेय देऊन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्याचप्रमाणे पिस्तुलाचा धाक दाखवून महिला पोलिस कर्मचाऱ्याचे दागिने, लॅपटॉप यांसारख्या मौल्यवान वस्तू चोरल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यातही या पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लज्जास्पद आणि घृणास्पद घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
दीपक सीताराम मोघे (रा. स्वारगेट पोलीस वसाहत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने नुकतीच खारक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मोघे याच्याविरुद्ध अनैसर्गिक कृत्य, बलात्कार व खुनाचा प्रयत्न, असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षण सुनील माने यांच्याशी संपर्क साधला असतं त्यांनी सदर प्रकार घडल्याची कबूली दिली आणि या प्रकरणी तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सौ. तोटेवार या असून त्यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती केली. सदर प्रकारची अधिक माहिती मिळविण्यासाठी तपास अधिकारी सौ. तोटेवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या “आऊट ऑफ रिच” असल्याचे आढळले.
याप्रकरणी एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडिता आणि मोघे एकमेकांना ओळखत होते. लॉकडाऊनच्या काळात मोघे या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जेवणासाठी येत असत. त्यावेळी मोघे यांनी महिलेला शीतपेयात गुंगीचे औषध पाजले. त्याने तिच्यावर बलात्कार करून ऑडिओ टेप बनवला.
यानंतर त्याने ही ऑडिओ टेप सोशल मीडियावर फिरवण्याची धमकी दिली. महिला पोलीस कॉन्स्टेबलवर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले. तिला धमकावले आणि पतीला घटस्फोट देण्यास भाग पाडले. त्याने तिला पिस्तुलाचा धाक दाखवून घरातून पाच ते सहा तोळ्याचे दागिने, मोबाईल सेट आणि लॅपटॉप चोरून नेला.

Leave a Comment

READ MORE