पिंपरी, दि. १८ (महाराष्ट्र मंथन) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासह तालेरा, जिजामाता, नवीन भोसरी, थेरगाव, आकुर्डी आदि रुग्णालय व २९ दवाखान्यांमध्ये शहरातील हजारो नागरीकांकडून अवैध पद्धतीने अधिक उपचार शुल्क आकरण्यात येत असल्याने सदर दवाखान्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आणि सदर अधिकारी आणि कर्मचारी यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश माननीय आयुक्त शेखर सिंह यांनी द्यावेत अन्यथा आम्हाला सविधांनाच्या सनदशीर मार्गाने आंदोलनाद्वारे न्यायचे दरवाजे ठोठावे लागतील, असे सामाजिक कार्यकर्ते मारुति भापकर यांनी संगितले. श्री गोफणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महापालिका यांनाही याची एक प्रत देण्यात आली आहे.
केंद्र व राज्य सरकारने वैद्यकीय सुविधा मोफत देण्याचे धोरण जाहीर केले आहे. राज्य शासनाने जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार देण्यास सुरुवात केलेली असताना आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्ण अथवा रुग्णाच्या नातेवाईकांकडून आगाऊ रक्कम जनरल वॉर्ड र.रू.३००, सेमी प्रायव्हेट रूम रु. ११००, प्रायव्हेट रूम र. रु ११००, आय सी यु र. रु १७००, पी आय सी यु (लहान मुलांचा अतिदक्षता विभाग) र.रु ११००, नवजात शिशु वार्ड र.रु११०० इतकी आगाऊ रकमेची मागणी केली जाते. रुग्णात व त्यांच्या नातेवाईकांनी ही आगावर कम भरण्यास असमर्थता दाखवल्यास रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेतले जात नाही.
पिंपरी चिंचवड शहर ही गोरगरीब कष्टकऱ्यांची नगरी आहे, या शहरात ७८ पेक्षा अधिक झोपडपट्टी आहेत. महापालिका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणारे रुग्ण गोरगरीब कुटुंबातील असतात त्यामुळे ज्या रुग्णाकडे किंवा त्यांच्या नातेवाईकाकडे आगाऊ रक्कम भरण्याकरता पैसे नसतील अशा रुग्णांनी पैशाअभावी मरायचे काय? त्यामुळे आपण या आगाऊ रकमेबाबत सर्व रुग्णालयांना तत्काळ आदेश काढून प्रतिबंध करावा व महापालिकेच्या सर्व रुग्णालय व दवाखान्याचा उपचार शासन निर्णयाप्रमाणे मोफत करावा. जर आगाऊ रकमेबाबत रुग्ण व अथवा त्यांच्या नातेवाईकांना वेठीस धरण्याचा प्रकार झाला तर आम्हाला नाईलाजास्तव आंदोलन करावे लागेल, असा सूर सामानी नागरिकांमधून उमटत आहे.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 9
Total views : 59571
Who's Online : 0