पिंपरी, दि. १४ (महाराष्ट्र मंथन):- काही बंगाली जादूटोना करणार्या व्यक्तींनी आपल्या सात महिन्याच्या गरोदर पत्नीचे गेल्या दोन दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण रूग्णालयातून अपहरण करून सर्व पित्री आमवस्येच्या दिवशी तीचा बळी देणार असल्याचा आरोप तिच्या पतीने पोलिसांकडे केला. पोलिसांनी आपल्या पत्नीला वाचवावे यासाठी ते पोलिस चौकीच्या दारात दिसत आहे. परंतू पोलिसांकडून मात्र ही गोष्ट अद्याप गांभिर्याने घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे. आज या महिलेचा बळी जाणार कां? यावर परिसरात उलटसुलट आहे.
याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी सदर महिलेचा काही बंगाली जादूटोना करणार्या व्यक्तींशी संपर्क आला. सदर महिलेला पहिल्या दोन मुली असून ती आता तीसर्यांदा गरोदर आहे. यावेळी तरी मुलगा व्हावा यासाठी काहींच्या सांगण्यावरून ही महिला जादूटोना करणारांना भेटली. त्यावेळी या व्यक्तींनी पोटात असलेले बाळही मुलगीच आहे. असे ठाम पणे सांगितले. त्याचबरोबर आपण जादूटोनाच्या मदतीने सदर मुलीचे गर्भातच मुलामध्ये रूपांतरण करण्याचा विश्वासही या व्यक्तींनी सदर महिलेला दिला.
मुलाच्या अपेक्षेने एके दिवशी तीने सारा प्रकार आपल्या पतीच्या कानावर घातली. त्यावेळी पतीने हे सर्व थोटांड आहे. त्यावर विश्वास ठेऊ नको. तसेच पुन्हा या बंगाली लोकांकडे जाऊ नको असा स्पष्ट सल्ला दिला. ही गोष्ट बंगाली लोकांना कळाल्यानंतर त्यांनी पती घरी नसताना महिलेची भेट घेऊन तीला पुन्हा गळी पाडले. हळूहळू या महिलेवर संमोहनाचा प्रयोग करून पतीला अंधारात ठेऊन आपण हे सर्व करू असा विश्वासही देण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी ही महिला नियमित तपासणीसाठी वाय सी एम रूग्णालयात आली खरी परंतू तेथून ती बेपत्ता झाली. या बंगाली जादूगारांच्या संमोहनाला बळी पडून आपली पत्नी त्यांच्या बरोबर पश्चिम बंगालला गेल्याचा आरोप तीच्या पतीने केला आहे. याबाबत त्याने पोलिस चौकीशी संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांमध्ये सर्व पित्री अमवस्या असून काळी जादू करणारी मंडळी या दिवशी गर्भवती महिलेचा नरबळी देतात आणि काही सिद्धी प्राप्त करतात, असे आपल्या ऐकण्यात आले असून त्यासाठीच आपल्या पत्नीचे अपहरण झाले असल्याचे त्याने वारंवार पोलिस यंत्रणेला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी या गोष्टीला थोडेही गांभिर्याने घेतलेले नाही. वार्यासारखी ही वार्ता परिसरात पसरली. काही पत्रकारांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांशी संपर्क साधला. त्यानंतर या पतीची तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजते. परंतू परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून ज्या गतीने हालचाली होणे अपेक्षित आहे. त्या गतीने कामकाज होत नसल्याचेही दिसत आहे.
या महिलेच्या अपहरणाचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी वाय सी एम रूग्णालयाचे सी.सी. टी. व्ही. फुटेज तपासले. पहिल्या फुटेजमध्ये सदर महिला वॅगन आर गाडीत बसून गेल्याचे दिसून आले. परंतू फुटेजमध्ये स्पष्ट असे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी वाय.सी.एम. रूग्णालयाबाहेरील निवास व व्यवसायीकांकडील सी.सी. टी.व्ही. फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आले की, खाजगी लोकांनी केवळ शो पीस म्हणुन सी.सी. टी.व्ही. लावले आहेत. यातील कोणताच सुरू नाही. एकाच ठिकाणी सी.सी. टी.व्ही. सुरू होता. तेथील फुटेज तपासल्यानंतर जवळपास आठ वॅगन आर गाड्या त्यावेळी गेल्याचे दिसून आले. त्यापैकी नेमकी कोणती गाडी तपासावयाची हा प्रश्न निर्माण झाला.
पोलिसांनी पुन्हा वाय.सी.एम. रूग्णालयाला भेट दिली. येथील मेन गेटवर असलेल्या सी.सी. टी.व्ही. फुटेज तपासण्याची परवानी मिळाल्याने ते तपासण्यात आले. त्यावेळी वॅगन आर गाडीच्या मागे एक रिक्षा उभी होती. त्यामध्ये बसून ही महिला गेल्याचे दिसून आले. सदर रिक्षा क्रमांकावरून पोलिसांनी रिक्षा चालकाची माहिती व फोन नंबर मिळविला आणि त्याच फोन करून पोलिस चौकीत हजर होण्याचे आदेश दिले. परंतू त्यानंतर सदरचा फोन बंद करून सदर रिक्षा चालक बेपत्ता झाल्याचे निष्पन्न झाले.
या एवढ्याच तपासात दोन दिवस लोटले असून आज सर्व पित्री अमवस्येचा दिवस उजाडला आहे. त्यामुळे आज आपल्या पत्नीचा नरबळी दिला जाणार यावर पतीचा ठाम विश्वास असून पोलिसांनी काही तरी करावे अशी अपेक्षा तो येणारा-जाणाराकडे व्यक्त करीत आहे. पतीच्या सांगण्यानुसार, ही गोष्ट खरी असेल तर खरोखरच सदर गर्भवती महिलेचा आज बळी जाणार कांय? यावर जनसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सदर महिलेबद्दल नागरीकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आता पोलिस तपासात या महिलेचा खरच शोध लागणार कांय? याची वाट सर्वच जण पहात आहेत.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 9
Total views : 59571
Who's Online : 0