खडकी, दि. १६ (महाराष्ट्र मंथन) :- रेंजहिल्स ख्रिश्चन युथ असोसिएशनच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त राजन नायर यांना संघटनात्मक कार्याबद्दल समाजाचा भविष्यातील वेध यांवर विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते व मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री. सुधीर हिवाळे आणि मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे, श्री. शामशुद्दीन तांबोळी, आमदार सिध्दार्थ शिरोळे, बिशप साकरपेकर, बिशप नादर, श्री. अशोक आंग्रे, श्री. आशिष जाधव, श्री. बाजीराव दळवी, श्री. जोजफ राजू ख्रिस्ती, पास्टर रूपसिंग श्री. सॅमसन जाधव, श्री. डेव्हिड काळे, पास्टर बेंजमीन काळे, पास्टर अनिल साळवे, पास्टर सुनंदा त्रिभुवन, डाॅ. पवार व त्याचप्रमाणे विविध साहित्यिक, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक समाज उपयोगी विषयांवर व्याख्याने झाली.
ख्रिस्ती समाजात असणारा व्यक्तीभेद, मतभेद यामुळे होणारे समाजाचे नुकसान, ख्रिस्ती तरूणांसमोर असलेल्या समस्या, राजकीय क्षेत्रात भक्कम नेतृत्व व सामाजिक बांधिलकी असणे आवश्यक आहे. राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्यात आत्मविश्वास व समाजाचा पाठिंबा याबाबत कमतरता, त्याचप्रमाणे ख्रिश्चन समाजाने येणाऱ्या निवडणुकीत सहभागी व्हावे व ख्रिश्चन समाजात स्वतः योगदान देऊन समाजासाठी संघटन, ऐक्य तयार करणारे नेतृत्व निवडून सामाजिक एकता तयार करावी असे विचार नायर यांनी व्यक्त केले.
रेंजहिल्स ख्रिश्चन युथ असोसिएशन चे अध्यक्ष श्री सुधीर हिवाळे आणि त्यांच्या पूर्ण टिम ने समाजातील सर्व धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान केला याबद्दल श्री राजन नायर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. सौ. स्नेहल पाडळे यांनी केले.












Users Today : 1
Users Yesterday : 7
Users This Month : 73
Users This Year : 473
Total Users : 42241
Views Today : 1
Total views : 58521
Who's Online : 0