निगडी, दि. १ (महाराष्ट्र मंथन) :- भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद पिंपरी चिंचवड (स्मारक समिती) ट्रस्ट भोसरी पुणे यांना मुस्लिम दफनभूमिच्या देखभाल दुरुस्ती व साफसफाईसाठी चार काळजीवाहक नेमण्याचा ठेका दिला असता ठेकेदार अझर खान यांनी ठेका घेतल्यापासून सदर ठिकाणी ४ ऐवजी ३ काळजीवाहकांनाच कामावर ठेवून गेल्या चार वर्षात कोणतेही दुरुस्तीची कामे केली नाहीत तसेच ठेकेदार यांनी पालिकेबरोबर केलेल्या कराराचे भंग करत असता भ्रष्टाचारात गुंतले आहेत, अशी शंका असल्याने मा. शेखर सिंग पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी सदर भ्रष्टाचाराचे प्रकरण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार दक्षता समितीकडे सोपवावे, अशी मागणी नवयुग निर्माण समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. आलमगीर कुरेशी यांनी पत्रकाद्वारे केली.
यावेळी श्री कुरेशी यांनी सांगितले कि, सदर मुस्लिम दफनभूमी मधील काळजीवाहकांच्या हजेरी रजिस्टर बुकमध्ये केवळ तीनच काळजीवाहकांची नोंद आहे. आजपर्यंत चौथा काळजीवाहक कामावर ठेवलेला नाही. सदर प्रकरणाच्या संबंधीत उक्त सादर केलेले संपूर्ण पुराव्यांची सखोल चौकशी केल्यास संबंधीत ठेकेदार व त्यात गुंतलेले अधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्टाचार केल्याचे आपल्या निदर्शनास येईल. तरी सदर झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेले ठेकेदार अझर खान व चौकशी दरम्यान सामोरे येणारे संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध पिंपरी चिंचवड महानगरपलिकेने सदर प्रकरण भ्रष्टाचार दक्षता समितीकडे सोपवावे.
यावेळी नवयुग निर्माण समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष शफिक शेख, पिंपरी चिंचवड अध्यक्ष अब्दुल्ला शेख, मद्रसा तालीमुल इस्लाम ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल्ला फतेमोहम्मद शेख, सामाजिक कार्यकर्ता नियमात शेख, श्री बिलाल शेख उपस्थित होते.












Users Today : 0
Users Yesterday : 7
Users This Month : 72
Users This Year : 472
Total Users : 42240
Views Today :
Total views : 58520
Who's Online : 0