शॉकिंग!!! अभिनेत्री पूनम पांडे हिचा सरवाईकल कॅन्सरमुळे मृत्यू..

आपल्या बोल्डनेस आणि वादांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री पूनम पांडे हिचे आज रोजी निधन झाले आहे. त्याच्या व्यवस्थापकाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ३२ वर्षीय पूनम पांडे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी झुंज देत होती. अभिनेत्री पूनम पांडे हिचे आकस्मिक निधन झाले आहे. पूनमला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. ३२ वर्षीय पूनम पांडेला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होता. अभिनेत्रीच्या टीमने याचा खुलासा केला आहे. पूनम पांडेच्या टीमने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात लिहिले आहे की, ‘आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे. आम्ही आमच्या लाडक्या पूनमला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने गमावल्याचे जाहीर करताना दुःख होत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक सजीवाला त्यांनी पूर्ण प्रेम आणि दयाळूपणा दिला. या दुःखाच्या काळात, आम्ही चाहत्यांकडून गोपनीयतेची विनंती करतो जेणेकरून आम्ही त्यांना प्रेमाने लक्षात ठेवू शकू.

Leave a Comment

READ MORE