चिंचवड, दि. १६ (महाराष्ट्र मंथन):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून सार्थक कांबळे नावच्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश पालिकेच्यावतीने देण्यात आले आहेत. सादर वाईट घटना आज दुपारी रोजी १२ वाजता घडल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.
काळेवाडी परिसरात राहणारा सार्थक कांबळे हा याच वर्षी या शाळेत दाखल झाला होता. इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला सार्थक हा शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांवर लोखंडी रेलिंग वर खेळत होता. मात्र, या रेलिंगवर खेळणे धोकादायक आहे, या ठिकाणी पडण्याची भीती असल्याचे त्याचा मित्र त्याला सांगत होता. मात्र, मित्राचे एकही न ऐकता सार्थक ने आपला खेळ सुरू ठेवला. या दरम्यान तोल गेल्याने त्याचा अपघात झाला. अचानक झालेल्या या अपघातात त्याला दुखापत झाल्याने तातडीने रुग्णालयात घालवण्यात आले होते. मात्र, यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
सार्थक कांबळे हा विद्यार्थी काळेवाडी परिसरात राहतो. याच वर्षी त्याला हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात टाकण्यात आले होते. मात्र, त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने सार्थकच्या आई-वडिलांनी आक्रोश केला. शाळेत निघण्यापूर्वी सार्थकचे आपल्या आई-वडिलांशी झालेले बोलणे हे शेवटचे ठरले. शाळेतून घरी येताना काळजी घे, असे त्याच्या आई-वडिलांनी त्याला सांगितले होते. आपण शाळेत पाठवलेला मुलगा जशाचा तसा आपल्याला परत द्या, अशी आर्त हाक सार्थकच्या वडिलांनी शाळा प्रशासनाला दिली आहे.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 6
Total views : 59568
Who's Online : 0