पिंपरी, दि. २६ (महाराष्ट्र मंथन):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातंर्गत येणाऱ्या दिव्यांग कक्षाच्या वतीने विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांतर्गत दि.२६ डिसेंबर २०२३ पासून ६० दिवसापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या हयातीचा दाखल्याबाबत घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाची मुदत २६ फेब्रुवारी २०२४ रोजी संपलेली असून २७ फेब्रुवारी २०२४ पासून २६ मार्च २०२४ पर्यंत या सर्वेक्षणाला मुदत वाढ देण्यात आली आहे.
ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर बदलेला असेल अशा लाभार्थ्यांनी तात्काळ योग्य त्या पुराव्यासह लेखी अर्ज मुख्य कार्यालयात सादर करावा. तसेच दिव्यांग नागरिकांनी हयातीच्या दाखल्याबाबत होणाऱ्या सर्वेक्षणाला महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी केले आहे.












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0