पिंपरी, दि. १ (महाराष्ट्र मंथन):- वाय.सी.एम.रुग्णालय अंतर्गत येणाऱ्या डोळ्यांचे हॉस्पिटल मासुळकर कॉलनी येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे डोळ्यांचे ऑपरेशन निकामी ठरून डोळ्यांना नुकसान झाल्याबद्दल संबंधित डॉक्टरांना बडतर्फ करावे आणि मला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी वेल्फेयर पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सालार भाई शेख यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंह यांना केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री सालार यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन 12/02/24 रोजी करण्यात आले. डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी त्यांना वायसीएम अंतर्गत येणाऱ्या डोळ्यांच्या हॉस्पिटल मासुळकर कॉलनी येथे 10 फेब्रुवारी रोजी ऍडमिट करण्यात आले व त्याच्या दोन दिवसानंतर डोळ्यांचे ऑपरेशन केले गेले. सदर ऑपरेशनमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हे ऑपरेशन निकामी ठरले व त्यामध्ये त्यांच्या डोळ्यांना नुकसान झाले व मला दिसण्यास त्रास झाला. सदर ऑपरेशन झाल्यानंतर 15 फेब्रुवारीला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांना डोळ्यांचा त्रास हा जास्त जाणवला व पहिल्यापेक्षा अजूनही कमी प्रमाणात दिसू लागले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ते डोळे चांगले न होता अजूनही निकामी झाले. ज्यामुळे सालार यांना दिसण्यास त्रास होत आहे किंवा क्वचित दिसतही नाही. तरी सदर ऑपरेशन करते वेळेस ज्या डॉक्टरांनी हा हलगर्जीपणा केला त्या डॉक्टरांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी श्री सालार यांनी केली आहे.
किती लोकांसोबत अशा प्रकारे हलगर्जीपणा केले असेल त्या सर्व लोकांना आणि माझ्या झालेल्या डोळ्यांच्या त्रासाबद्दल मला नुकसान भरपाई मिळावी व सदर डॉक्टरांना बडतर्फ किंवा कामावरून काढून टाकण्यात यावे. जेणेकरून यापुढे त्यांच्याकडून हलगर्जीपणा होणार नाही व माझ्या नंतर माझी जसी दृष्टी गेली आहे किंवा मला दिसत नाही तसे इतरांसोबत होणार नाही, असे निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांना समक्ष भेटून देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष ईमाम नदाफ, खाजा नदाफ, अमिल सैफी, अल्पसंख्यांक विकास महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रफिक भाई कुरेशी, फिरोज तांबोळी उपस्थित होते.













Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 9
Total views : 59571
Who's Online : 1