- उमेदवार संजोग वाघेरेंचा खोपोलीत पदयात्रा काढून महाविकास आघाडीकडून प्रचार
खोपोली, दि. २१ (महाराष्ट्र मंथन) :- विद्यमान खासदारांनी घाटाखाली दहा वर्षे दुर्लक्ष केले. त्यांनी या भागांत विकासकामे केली नाहीत. दहा वर्षे कोठे गायब झाले होते माहित नाही. आता त्यांना कायमचे घरी बसविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी संतप्त भावना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे संपर्कप्रमुख हमीद शेख यांनी व्यक्त केली. - महाविकास आघाडीचे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ खोपोली परिसरात पदयात्रा काढण्यात आली. त्यात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डोक्यावर टोपी, गळ्यात उपरणे, हातात “मशाल” चिन्ह घेतलेले कार्यकर्ते संजोग वाघेरे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. खोपोली परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली.
- या पदयात्रेत हमीद शेख म्हणाले की, खासदारांनी कोणतीही कामे केलेली नाहीत. ते दहा वर्षात कधी इकडे दिसलेच नाहीत. नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत तीव्र भावना आहेत. खोपोली परिसरातील या पहिल्याच पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या पदयात्रेनिमित्ताने मी ग्वाही देतो की, संजोग वाघेरे पाटील यांचा विजय पक्का आहे. तसा निर्णय सर्व स्तरातील मतदारांनी घेतलेला आहे.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 181












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0